मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Monday, May 04, 2015
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
 
श्री कुलदीप पेडणेकर करित आहेत 'संकासूर्'ची निर्मिती.
बुधवार, ०६ जून २०१२ | © मराठीमुव्हीवर्ल्ड

Sankasur
दशावतारी नाटकांना कोकणाच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचे स्थान आहे. विष्णूच्या दहा अवतारांचे नाट्यरुप दर्शन त्यातून घडविले जातं. म्हणून याला दशावतारी नाटक असे म्हणतात. या दशवतारातील 'संकासूर' हे पात्र मालवणी मुलखातील आबालवृद्धांच्या गळ्यातील ताईत आहे.

'आई श्री भगवतीदेवी' या प्रॉडक्शनद्वारे 'संकासूर' निर्माण होत असून कोकणचे सुपूत्र आणि महाराष्ट्र राज्य मत्स्य उत्पादन महामंडळाचे उपाध्यक्ष श्री कुलदीप पेडणेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. संकासूराचे पात्र रंगवणार्‍या दाजी गावकर या प्रसिद्ध दशावतारी कलाकाराभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते.

या चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन श्री. ज्ञानेश्वर मर्गज करत आहेत. चित्रपटाचे छायांकन श्री. राजा फडतरे करीत आहेत. 'संकासूर'ची मध्यवर्ती भूमिका कोण करणार हे गुपित चित्रपटाच्या मुहुर्तादिवशीच उघड केले जाणार आहे. मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2015. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.