'सुर्य एंटरटेन्मेंट' पुणे, बॅनरखाली निर्माते प्रमोद गोरे यांनी 'लेट्स गो बॅक'
(परत फिरा रे...) ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बच्चे कंपनी आणि त्यांच्या
पलकांच्या मनोरंजनाच्या हेतूने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याने
सुट्टीच्या काळात म्हणजेच १५ एप्रिलला हा चित्रपट पुणे, कोल्हापुर, सातारा,
सांगली व औरंगाबाद येथे प्रदर्शित होत आहे. प्रमोद गोरे यांनी अशोक राऊत यांच्या
समवेत या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथा, पटकथा, संवाद व गीते स्वतः
प्रमोद गोरे यांनी लिहीली आहेत.
या चित्रपटात निलय गायकवाड, रोनक लांडगे, उन्मेश पाध्ये, सत्या यादव व तेजा
जाधव यांच्यासह भाग्यश्री राणे, शिल्पा गोंजारे, रश्मी पांढरे अशा बर्याच
कलाकारांचा आणि शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या चित्रपटाच छायांकन जितू
आचरेकर आणि नृत्य दिग्दर्शन अनिल सुतार आणि संकलन संतोष गोठोस्कर यांच आहे.