Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Wednesday, February 22, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
- Making Slide Show -
'मसाला'ची  महाराष्ट्र सफर.
२८ जानेवारी २०१२ © मराठीमुव्हीवर्ल्ड
प्रविण मसालेवालेचे संस्थापक हुकमीचंद चोरडिया आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई यांच्या आयुष्यावर प्रेरित होऊन 'मसाला' या चित्रपटाची निर्मिती होत आहे. प्रविण मसालेवाले यांचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याच्या निमित्तानेच झकास पचास हे सेलिब्रेशन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मसाला या चित्रपटाची निर्मिती.

उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांच्या आरभाट या संस्थेची निर्मिती असलेल्या 'मसाला' या चित्रपटासाठी पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले पुण्याची ओळख दाखविणार्‍या ठिकाणांचे चित्रण चित्रपटात असून त्यासाठीच आज पुण्यातल्या पौड रोड, शनिवारवाडा अशा वैशिष्ट्यपूर्णं भागात आज 'मसाला' या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भेटीगाठींसाठी एक आगळीवेगळी संकल्पना तयार करुन मसालाची टूर काढण्यात आली होती. अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि पुणे ही मसाला टूरच्या पहिल्या सत्रातील ठिकाणे होती. लवकरच दुसर्‍या फेरीला सुरुवात होणार असून त्यात मुंबई ते विदर्भ असा प्रवास घडणार आहे.

पुणे-मुंबई या महानगरांमध्ये मराठी सिनेमाची चर्चा अधिक होत असते, कलाकारांच्या भेटीगाठी होत असतात परंतु शहराबाहेरच्या रसिक प्रेक्षकांनासुद्धा या चित्रपटाची माहिती व्हावी, आणि महाराष्ट्रातल्या सर्वच महत्त्वाच्या शहरातल्या प्रेक्षकांशी या निमित्ताने संवाद साधावा हा या टूरचा मुख्य हेतू असून 'मसाला' या चित्रपटाची एक आकर्षक बस तयार करण्यात आली आहे. चित्रीकरण पहायला आलेल्या प्रेक्षकांशी आणि त्या ठिकाणच्या प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला जात आहे. एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 
Masala, Amruta, Girish



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.