Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
सिनेवार्ता

भरतचा 'वशाट' चा डाव झाला 'वशाड' !!
२१ एप्रिल २०११ © मराठीमुव्हीवर्ल्ड

विनोदाचा बादशाह भरत जाधव याच्या घरी मांसाहार साफ वर्ज्य आहे. त्याच्या घरी शाकाहारी जेवणाचा घरंदाज बेत रोज वहिनी आखतात. पण तरी भरतच्याच भाषेत सांगायचे तर रोजच्या या 'घासफूस' जेवणाला तो पार कंटाळलाय. एके दिवशी वहिनींची नजर चुकवून त्याने मांसाहारी जेवणाचा (त्याला भरत 'वशाट' म्हणतो) खास बेत आखला. अनेक दिवसांची 'वशाट' खायची प्रबळ इच्छा पूर्ण होणार म्हणून भरत खुशीत होता. 'वशाट' वर दणकून ताव मारण्याचा जोरदार घाट त्याने घातला. पण दैव देतं आणि कर्म नेतं, अशी गत! 'वशाट'च्या पहिल्या घासालाच चोरी पकडली गेली... आणि 'वशाट' चा डाव 'वशाड' झाला!!

सध्या 'वशाट्'चे वेड डोक्यातून बाजूला करुन भरत आपल्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. झी टॉकीजची प्रस्तुती आणि शेमारु एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या 'मस्त चाललंय आमचं' या चित्रपटाकडे सध्या त्याचे लक्ष लागून आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २९ एप्रिलला झळकतोय.

 
vijay patkar, Bharat Jadhav
User's Comments
Atul
Atul | Tue, Apr 26, 2011 at 4:44 PM
Bharat Jadhav acting
Bharatji tumchi acting aamla nehamich aawdate madhyantarichya kalatil kahi picture sodun.... tumhala navin picture sathi shubhechya ... ha picture aamha sarvanche khup manoranjan karen ashi apeksha.... Aapala Ek Fan.
Post your comments »



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.