Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Wednesday, February 22, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
'मॅटर'च्या ध्वनीफितीचं अनोखं अनावरण.
२५ जानेवारी २०१२ © मराठीमुव्हीवर्ल्ड
सारथी एण्टरटेनमेंट या बॅनरची निर्मिती असलेल्या आणि सतिश मोतलिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मॅटर' या चित्रपटाचा म्युझिक लॉच सोहळा रंगला तो फ्लॅश मॉबच्या संगतीने.

फ्लॅश मॉब म्हणजे जिथे १०० ते १५० जणांचा जमाव एखाद्या कारणासाठी एकत्र येऊन नृत्य सादर करण्याचा प्रकार. काही दिवसांपूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये फ्लॅश मॉब सादर केला होता. या ग्रुपने पुढे ठाण्यातील कोरम मॉल मध्ये एकत्र येऊन तिथेही 'मॅटर'च्या या अनोख्या डान्सच्या गाण्यांवर ठेका धरला. फ्लॅश मॉब या अनोख्या डान्सनंतर कोरम मॉलमध्ये 'मॅटर'च्या कलाकार तंत्रज्ञांच्या सोबतीने दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे यांनी या चित्रपटाच्या ध्वनिफितीच प्रकाशन केल. या प्रसंगी अभिनेता संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिग्दर्शक सतिश मोतलिंग, निर्माती पूनम शेंडे, संगीतकार अभिजित कवठाळकर, अभिनेत्री मेघा धाडे, व्हिडिओ पॅलेसचे नानू जयसिंघानी आदि मान्यवर उपस्थित होते.  

'मॅटर' या चित्रपटात एकूण ११ गाणी असून ती ओरिजनल आणि रिमिक्स ट्रॅकमध्ये रसिकांना ऐकता येतील. जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, अभिनेत्री मेघा धाडे, योगिनी चौक आणि रुमा बोंद्रे यांनी चित्रपटातील या गाण्यासाठी पाश्वर्गायन केलं आहे. याशिवाय इतर गाण्यांसाठी अभिजित कवठाळकर, आदर्श शिंदे, आशिष गाडे, सागर सातपुते, अभिषेक मोतलिंग, रेश्मा सोनवणे अशा यंग बिग्रेड गायकांचा वापर करण्यात आला आहे. जितेंद्र जोशी आणि दिपक ठुबे यांच्या गीतांना अभिजित कवठाळकर यांनी संगीतबद्ध केलं आहे.


 
Mahesh Kothare, Santosh Juvekar, Matter



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.