मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Monday, April 27, 2015
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
'लोकशाहीर विठ्ठल उमप मृद्गंध पुरस्कार' सोहळा संपन्न.
मंगळवार, १७ जुलै २०१२ | © मराठीमुव्हीवर्ल्ड

Click Here To View Exclusive Photographs
Lokshahir Vitthal Umap Mrudgandh Puraskar
आपल्या खडया आवाजाने अवघा महाराष्ट्र हादरवून सोडणारे आणि लोककलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठेने काम करणारे लोकशाहिर विठ्ठल उमप यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा मृदगंध पुरस्काराचा भावनिक सोहळा मोठ्या थाटात पार पडला. लोकशाहिर विठ्ठ्ल उमप आणि त्यांच्या पत्नी वत्सलाबाई उमप यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून 'लोकशाहीर विठ्ठल उमप मृद्गंध पुरस्कार' सोहळा वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने १५ जुलैला आयोजित करण्यात आला होता.

यावेळी लोककला, साहित्य, नाटक, चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा मृद्गंध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याचा परमोच्चबिंदू ठरला तो लोकशाहिर कृष्णाजी साबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देतानाचा क्षण. वत्सला प्रतिष्ठानच्या विश्वस्त श्रीमती वत्सलाताई उमप यांच्या हस्ते हा पुरस्कार शाहिर साबळेंना देण्यात आला. यावेळी विठ्ठल उमपांचे सुपुत्र आदेश, उदेश, संदेश, नंडेश उमप आणि शाहिर साबळेंचे नातू तथा दिग्दर्शक केदार शिंदे आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचं नेपथ्य आणि प्रकाश योजना सुनील देवळेकर, नृत्य दिग्दर्शन विश्वास नाटेकर, ध्वनी संयोजन संजय राणे, निवेदन मंगला खाडीलकर आणि व्यवस्थापन  वत्सला प्रतिष्ठानचे विश्वस्त राजन गावंड, विजय उबाळे, डि. के. मोरे, नरेश कुलकर्णी, संजय गवळी यांनी केले. यासाठी मी मराठी या कार्यक्रमातील कलावंतांचेही सहकार्य लाभले.  

Tags: लोकशाहीर विठ्ठल उमप, लोकशाहीर विठ्ठल उमप, मृद्गंध पुरस्कार २०१२, श्री. राजन गावंड, श्री उदेश विठ्ठल उमप, श्री. नंदेश उमप, वत्सला प्रतिष्ठान, Lokshahir Vitthal Umap, Mrudgandh Puraskar मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2015. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.