मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Tuesday, April 21, 2015
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
मुमैत खान 'प्रीतम प्यारे' नंतर आता मराठीत 'देते तुम्हा विडा'
शनिवार १८ ऑगस्ट २०१२| © मराठीमुव्हीवर्ल्ड
Hot Mumait Khan Photo, Lavani Song
'करून टाक गोलमाल' या चित्रपटाचे नाव आता  बदलले  असून, "धमक ...दि  गट्स" असे झाले आहे. ह्या चित्रपटात  मुमैत खान  हि एका लावणी मध्ये आपणास दिसणार आहे.
मुहूर्ताच्या क्षणापासून चित्रीकरणपर्यंत सर्वच ठिकाणी हा सिनेमा चर्चचा विषय ठरला आहे. अनिकेत विश्वासराव आणि गिरीजा जोशी यांची नवीन कोरी जोडी, "शैला " च्या रुपात मेघना नायडूची या चित्रपट झालेली एन्ट्री, खलनायकी रंग उधळण्यासाठी सुनी शिंदेची निवड, गाण्यासाठी वापरण्यात आलेली नयनरम्य लोकेशन्स तसेच दाक्षिणात्य शैलीतील साहस दृश्ये या गोष्टींमुळे 'धमक...दि गट्स' हा सिनेमा प्रसार माध्यामांप्रमाणेच  सिनेसुष्टीतही चर्चेचा विषय ठरतोय. 

सी एस  फिल्मच्या बॅनर खाली तयार होणाऱ्या या सिनेमात आता आणखी एका वैशिष्ट्याची भर पडली आहे, मुमैत खान हिने सादर केलेल्या लावणी मुळे. मुमैत खान ने संजय दत्ताची प्रमुख भूमिका असलेल्या 'मुन्नाभाई एम बी बी एस ' ह्या सिनेमातील 'देख ले आंखो मी आंखे डाल देख ले...' या गाण्यात जिमी शेर्गीलसह रसिकांचे मन जिंकली, तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'राउडी राठौड' मधील  'प्रीतम प्यारे' या  आइटम नंबर मध्ये प्रेक्षकांती तिच्या नृत्याची अदा पाहिली आहे. मराठी मधील तिचे हे पहिले गाणे नक्कीच सर्व प्रेक्षकांना तितकेच आवडेल असे निर्मात्यांचा विश्वास आहे. 

गीतकार राजेश बामुगाडे ह्यांनी लिहिलेल्या सदर लावणीचे बोल 'देते तुम्हा विडा आणि सुपारी फोडा...' असे असून संगीतकार निर्मल कुमार यांनी ती संगीतबद्ध केली आहे. उमेश जाधव ह्यांनी ह्या लावणीचे कोरिओग्राफी केली आहे. तर उत्तर केळकर ह्यांच्या आवाजात ही लावणी ध्वनिमुद्रित करण्यात आली आहे . लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे . 
मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2015. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.