Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, February 11, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता

अष्टपैलू निळू फुले यांचे निधन.
13 July 09 | ©MMW News

'सखाराम बाईंडर' मधल्या सखारामची भूमिका आपल्या अभिनय कौशल्याने जिवंत करणार्‍या निळू फुले (उर्फ निळकंठ कृष्णाजी फुले) यांचे सोमवारी दिनांक १३ जुलै रोजी पहाटे दोनच्या सुमारास कर्करोगाने पुण्याच्या जहांगिर या खासगी रुग्णालयात निधन झाले. सकाळी त्यांचे पार्थिव पौंड रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.  यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पुण्याच्या महापौर राजलक्ष्मी भोसले, पिंपरी-चिंचवडच्या महापौर अपर्णा डोके, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, अमोल पालेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार, अभिनेते रवींद्र मंकणी, सयाजी शिंदे, अभिनेत्री मधू कांबीकर उषा चव्हाण, यांच्या सह अनेक मान्यवर व फुले यांचे अनेक चाहते उपस्थित होते.    
              
ते ७९ वर्षांचे होते.दोन महिन्यापुर्वी अन्ननलिकेच्या कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते फारसे घराबाहेर पडत नव्हते. ते गेले काही दिवस अंथरुणालाच खिळून होते. गेल्या रविवारी त्रास वाढल्याने त्यांना जहांगिरमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांना अतिदक्षता विभागातून हलविल्यानंतर त्यांना सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. 

गेली ५ दशके  मराठी चित्रपटसृष्टी आणि नाटय सृष्टीवर त्यांनी आपलं वर्चस्व गाजवलं.पडद्यावर त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या. पडद्यामागे ते एक समाजसेवक होते. तेसेवादलाचेअसल्याचेसांगितले.
                                                                                   
Nilu Phule



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.