Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Sunday, February 05, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
निळू फुले यांना 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज कलागौरव पुरस्कार' प्रदान.
29 June 09 | ©MMW News
निळू फुले यांनी सलग ४० वर्षे मराठी चित्रपट व या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी आतापर्यंत मराठीतून जवळपास १३८-१४० सिनेमे  केले आहेत.  फक्त मराठीतच नाही तर जवळपास १२ हिंदी चित्रपटामध्येसुद्धा निळू फुले यांनी काम केलेले आहे. 

सातारा येथील भारतीय भटके विमुक्त विकास संशोधन संस्थेचा पहिला 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज कलागौरव पुरस्कार' संस्थेचे उपाध्यक्ष बाबा आढाव आणि सरचिटणीस लक्ष्मण माने यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काचे स्वरुप होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा समारंभ निळू फुलेंच्या निवासस्थानीच अत्यंत साधेपणाने पार पडला. या वेळी रजनीताई फुले, परशुराम वाडेकर, मकबुल तांबोळी दीपक म्हस्के, विजय मांडके उपस्थित होते. ते सध्या अन्ननलिकेच्या विकाराने आजारी आहेत. आहार कमी झाल्याने अशक्तपणा आला आहे. व घरातल्या घरात सुद्धा फिरणे अशक्य झाले आहे. या कारणामुळे त्यांनी अनेक पुरस्कार नाकारले आहेत. हा पुरस्कार उभं राहून सन्मानाने घेता न आल्याने त्यांनी सर्वांची माफी मागितली.
 


Nile Phule




मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.