देवेंद्र चौगुले यांची संकल्पना आणि निर्मिती असलेला 'संभा . . आजचा छावा' या
चित्रपटात ते स्वतः मुख्य भूमिका साकारत आहेत. आजच्या महागाईला जवाबदार असलेले
भ्रष्टाचारी आणि जीवनावश्यक वस्तुंचा साठा आणि काळाबाजार करणरे लोकही महागाईला
कारणीभूत आहेत. अशाच साठेबाजांच्या विरुद्ध 'संभा' लढा उभारणार आहे.
अतिशय आधुनिक अशा व्हिएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन या चित्रपटाची निर्मिती झाली.
चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद संजय पवार यांनी लिहीले असून दृश्य संजय तोडकर, साहस
दृश्य - आनंदराज, नृत्य दिग्दर्शन -कलाधरन, छायांकन - गिरीश उदाळे यांनी केले आहे.
'समृद्ध जीवन' प्रस्तुत 'संभा . . आजचा छावा' चित्रपटात देवेंद्र सोबत दिपाली सय्यद,
मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, कुलदीप पवार, अमधु कांबीकर, तेजश्री खेळे आदि
कलाकारांच्या भूमिका आहेत.