Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Wednesday, February 22, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
भारतातला पहिला क्रोमा मराठी चित्रपट 'सांग सांग गंगाराम' तयार.
१८ जानेवारी २०१२ © मराठीमुव्हीवर्ल्ड
सिने रसिकांना नवीन वर्षातला आधुनिक तंत्रज्ञाने सज्ज असा मराठीतला नाही तर भारतातला पहिला संपूर्ण क्रोमा मध्ये चित्रित झालेला अस्सल मराठमोळा 'सांग सांग गंगाराम'  ह्या चित्रपटाच चित्रीकरण पूर्ण झालं आहे.

सांग सांग गंगाराम या चित्रपटची कथा व पटकथा जगदीश वाठारकर यांची आहे. कथा फॅन्टसी व विनोदी आहे. बाबुराव नावाचा तरुण अपघातात स्वर्गवासी होतो. इंद्रलोकात चित्रगुप्ताच्या दरबारात बाबुरावाचा आत्मा पोहचलेला असतो. खाली पृथ्वीवर अधर्म असत्याचा प्रभाव इतका वाढला आहे की सत्य डळमळीत झाले आहे. धर्म बुडायला लागला आहे. तेव्हा पृथ्वी भ्रमण करून ह्या गोष्टीची खात्री केली पाहिजे, असे सर्वानुमते ठरते व पृथ्वीवर यमराजांना पाठवायचे ठरते. यमराज पृथ्वीवर येतात, त्यांना गंगाराम भेटतो, तो पृथ्वीवर चाललेल्या घडामोडी यमराजांना दाखवितो. मग यम आणि गंगाराम पृथ्वीवर काय हंगामा करतात. यमाला पृथ्वीवर काय काय अनुभव येतात? बाबुराव कोमातून बाहेर येतो काय? आणि नवशी सावित्री सारखी आपल्या नवऱ्याला यमाच्या पाशातून कसे सोडविते? आणि हे फक्त गंगारामच सांगू शकतो.

सांग सांग गंगाराम मध्ये गंगाराम कमलाकर सातपुते व यम अभिजीत चव्हाण यांनी साकारला आहे. सांग सांग गंगाराम ची गीते दिग्दर्शक जगदीश वाठारकर यांनी लिहिली असून बुजुर्ग संगीतकर बाळ पळसुले यांनी दिलं आहे. संवाद एन, रेळेकर, शैलेंद्र पाटील व जयप्रकाश परुळेकर या तिघांनी मिळून लिहिली आहेत. छायाकन अजिजभाई मोतीवाला, ध्वनी प्रकाश निकम यांचा आहे. कमलाकर सातपुते, अभिजीत चव्हाण, श्वेता बोराडे यांच्यासह  सिधेश्वर झाडबुके, संदीप पाटक, अरुण कदम, सुरेखा कुडची, रवी फलटणकर, भालचंद्र कुलकर्णी, उमेश बोळके छाया सागावकर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

पुढील दोन महिन्यात व्हिज्युअल ग्राफिक (VFX) पूर्ण होईल व लवकरात लवकर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.