भिन्न रुची बाळगणाऱ्या माणसांची आवडती गोष्ट म्हणजे नाटक. या
नाटकांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यावर्षी प्रथमच संस्कृती कला दर्पण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर
सांडवे आणि उपाध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी 'संस्कृती कला दर्पण नाट्य महोत्सव
२०१२' चे आयोजन केले आहे.
'संस्कृती कला दर्पण नाट्य महोत्सव २०१२' या नाट्य महोत्सवाचा उदघाटन सोहळा
९२ व्या
अ. भा. म. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व जेष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांच्या शुभहस्ते
पार पडला.
'संस्कृतीला कला दर्पण नाट्य महोत्सवा' मध्ये एकूण २९ व्यावसायिक नाटकांमधून
उत्कृष्ट १० नाटकांची निवड करण्यात आली. व्यावसायिक नाट्य परीक्षणाचे काम लीलाधर
कांबळी, शशिकांत शिर्सेकर, अरुण घाडीगांवकर आणि नंदू गाडगीळ यांनी केले. तसेच ११
प्रायोगिक नाटकांमधून उत्कृष्ट ४ नाटकांची निवड निखील हजारे आणि अरुण घाडीगावकर
यांनी केली. यामध्ये 'कोणे एके काळी', 'लख लख चंदेरी', 'अजिंठा' आणि 'बागुलबुवा' या
नाटकांचा देखील समावेश करण्यात आला आहे.