Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, February 11, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
नावातले 'घोटाळे' बदलण्यासाठी सोनाली (SONALI) कुलकर्णी बनणार सोनाली (SONALEE).
२ जानेवारी २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड
नावात किंवा आडनावात साघर्म्य असू शकतं पण नाव आणि आडनाव दोन्ही सारखं असल्याने लोकांपर्यंत पोहचण्यास अडथळा येऊ शकतो. मराठी चित्रपट सृष्टीत एक सोनाली कुलकर्णी प्रसिद्ध होती आणि आहे पण 'बकुळा नामदेव घोटाळे' या केदार शिंदेच्या चित्रपटाने या चित्रपटसृष्टीला आणखी एक सोनाली कुलकर्णी दिली. त्यामुळे आधीच्या सोनाली कुलकर्णीला 'दिल चाहता है' फेम सोनाली कुलकर्णी आणि दुसर्‍या सोनाली कुलकर्णीला 'बकुळा नामदेव घोटाळे' फेम सोनाली कुलकर्णी म्हणून ओळखू लागले.

सोनाली कुलकर्णी नाव जरा जास्त वेळा वापरल्याने तुम्ही पण गोंधळलात ना? पण आता हा गोंधळ संपणार आहे. कारण आता 'बकुळा नामदेव घोटाळे' फेम सोनाली कुलकर्णी आपलं नाव फक्त सोनाली लावणार आहे. एवढचं नाही तर ती म्हणे नावाचं स्पेलिंगसुद्धा SONALI च्या ऐवजी SONALEE करणार आहे. . . . असो.... तिचा महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'नटरंग' हा चित्रपट १ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. नवीन वर्षाची सुरुवात एवढी छान झाल्यावर वर्ष पण झक्कास असेल यात काही शंका नाही. पण नावातला हा बदल सुद्धा फायद्याचा ठरावा.... 
 
Sonalee



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.