आयुष्यात कुठल्या गोष्टीला अधिक महत्व आहे शिक्षण कि पैसा? ह्या विचारावर आधारित स्टार प्रवाह वर 'लक्ष्मी v/s सरस्वती' हि नवीन मालिका २५ जूनपासून सुरु होत आहे. कोळी समाजाची पार्श्वभूमी असलेल्या ह्या मालिकेत जरी वेगळ्या विषयावर सादरीकरण असले तरी मुळ कथा मात्र सासू आणि सून ह्यातील परस्परविरोधी विचारांमधील द्वंद्वं रंगवण्यात आलेले आहे. लक्ष्मीचा ( सविता मालपेकर ), म्हणजेच सासूचा हा ठाम विश्वास आहे की पैशाने आयुष्यात प्रत्येक आनंद खरेदी करता येतो, मात्र सरस्वतीला ( स्वाती लिमये ) म्हणजेच सुनेला असे वाटते की आयुष्यात जर पुढे जायचे असेल, प्रगती करायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही.
ह्या मालिकेत सरस्वतीच्या रुपात स्वाती लिमये तर खाष्ट सासूच्या रुपात सविता मालपेकर बर्याच कालावधी नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ह्या मालिकेची निर्मिती रिलायन्स बिग प्रोडक्शन्सची असून ह्याआधी त्यांनी स्तर प्रवःवरील लोकप्रिय मालिका 'स्वप्नांच्या पलिकडले' ची निर्मिती केली होती. येत्या सोमवारपासून दर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता ह्या मालिकेचे प्रसारण करण्यात येणार आहे .
Tags: Star Pravah, Marathi Television, Laxmi V/Navache, Savita Malpekar, लक्ष्मी v/s सरस्वती, सविता मालपेकर, स्वाती लिमये
|