मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Wednesday, November 26, 2014
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
'तू तिथे मी' १६ एप्रिलपासून झी मराठीवर दाखल.
१२ एप्रिल २०१२ © मराठीमुव्हीवर्ल्ड

रांगडा सत्यजीत आणि मंजिरी यांच लग्न अगदी ठरवून झालेलं. परस्परांशी अजिबात ओळख नसलेले हे दोन ध्रुवावरचे दोघे लग्नानंतर एकत्र येतात आणि परस्परांना सुखी करण्यासाठी वचनबद्ध होतात. खरंतर विश्वसाच्या आधारावर उभं असलेलं हे नातं प्रेमाने हळूवार उमलत जातं. विश्वासाच्या पायावर सुखी संसाराच्या घेतलेल्या या आणाभाका सत्यजित आणि मंजिरीला पूर्ण करता येतील... याचा वेध घेणारी कथा म्हणजेच 'तू तिथे मी' ही झी मराठीवरची नवी मालिका.

या मालिकेच लेखन चिन्मय मांडलेकर यांचे असून या मालिकेत ते सत्यजीतच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर मंजिरीच्या भूमिकेत आहे आपली शमिका म्हणजेच मृणाल दुसानीस तर अन्य भूमिकांमध्ये प्रिया मराठे, विद्या करंजीकर, वंदना वाकनीस, अजय पूरकर, शर्वाणी पिल्ले आणि रमेश भाटकर प्रमुख भूमिका बजावत आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन श्रीधर पाटील करत असून छायांकन पुष्पांक गावडे यांचे आहे. शीर्षक गीताला अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे. निर्माते शशांक सोळंकी यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. 'तू तिथे मी' ही मालिका १६ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता झी मराठीवर दाखल होत आहे.

 
Tu Titeh Mee, Zee Marathi



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2013. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.