| |
|
|
| सिनेवार्ता |
'वृंदावन' मालिकेचे १०० भाग पूर्ण.
२४ जुलै २०१०
© मराठीमुव्हीवर्ल्ड |
मी मराठी वाहिनीवर सोम. ते शुक्र. सायं. ७.०० वा प्रसारित होणारी वृंदावन ही
मालिका १०० भाग पुर्ण करुन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेची कथा
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या, फॅशनेबल, मॉड झालेल्या संस्कृतीला भेद देणारी
आहे. वारकरी सांप्रदायातील पांडुरंग भक्तांच्या जीवनाशी निगडीत आहे. सरळसाधे
स्वभाव, एकमेकांविषयी असलेला जिव्हाळा यामुळे या मालिकेतील पात्र ही आपल्या अवती
भवती आपल्याशी निगडीत असल्यासारखी वाटतात.
वृंदावन या मालिकेची निर्मिती निता देवकर यांनी आपल्या सुर्यतेज प्रॉडक्शन या
निर्मिती संस्थेअंतर्गत केली आहे. या मालिकेचे संवाद निता नामजोशी यांनी लिहिले
आहेत. मालिकेचे शिर्षक गीत रोहिणी निनावे यांनी लिहीले असून निलेश मोहरीर यांनी
संगीत बद्ध केले आहेत. वृंदावन मालिकेची निर्माण व्यवस्था सुनिल भालेराव याची
असून कार्यकारी निर्माता मेनानाथ गाडे आहेत. |
 |
|
|
|
|
|
|
|
|