Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
सिनेवार्ता
- Movie Stills -
  
२० जानेवारीला येणार 'या गोल गोल डब्यातला' चित्रपट.
१८ जानेवारी २०१२ © मराठीमुव्हीवर्ल्ड
असित रेडीज लिखित, दिग्दर्शित आणि रिद्धी एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेला 'या गोल गोल डब्यातला' हा चित्रपट २० जानेवारी २०१२ रोजी तो महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

रिद्धी एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटात बाप आणि बेटा या दोघांच्या नात्याचा, या दोन पिढ्यांमधल्या वैचारिक संघर्षाचा विषय हाताळण्यात आला आहे. निसार खान, मितेश देसाई, मुकेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, स्मिता तळवळकर, संतोष जुवेकर, स्मिता शेवाळे, आशालता वाबगावकर, बाळ धुरी, विजय चव्हाण, माधव अभ्यंकर, शैलेश दातार, आकांक्षा ठाकूर, प्रफुल्ल सामंत, प्रतिभा गोरेगावकर, इरावती लागू, रश्मी येसूगडे यंच्यासोबतच बालकलाकार पप्पन पाटील आणि आकांक्षा जगदाळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन आसित रेडीज यांचे असून चित्रपटाचे संवाद प्रवीण शांताराम आणि आसित रेडीज यांनी लिहीले आहेत. गीते बाबा चव्हाण यांनी लिहीली असून अशोक सराफ, मुग्धा वैशंपायन, क्षितीज तारे, निहीरा जोशी आणि हृषिकेश कामेरकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांना संगीतकर सतीश चंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे. समीर आठल्ये यांचे छायांकन असून राजेश राव यांनी संकलन केले आहे,

शहरी आणि ग्रामीण संदर्भ असलेले कथानक असल्याने सगळ्याच स्तरातील प्रेक्षकांना हा चित्रपट पसंत पडेल याबद्दल शंकाच नाही,
 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.