डेबू -
हा
चित्रपट मराठी लोकांच्या लाडके संत
गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित आहे आणि चित्रपट कुठेही अतिशोक्ती न
करता वास्तव बाबांचे दर्शन घडविते.
बाबांचा जन्म हा
एक छोट्याशा खेडेगावात एका गरीब शेतकरी कुटुंबात.
डेबू हा एका सरळमार्गी आणि
परोपकारी माणूस.
त्याची बायको (अश्विनी एकबोटे)
हि
सुंदर आणि सोज्वळ.
त्याच्या आईचा (मधु
कांबीकर) डेबू लाडका पण डेबूच्या आयुष्यात अचानक धक्कादायक घटना घडतात आणि
तो पूर्णपण तुटून जातो.
त्यांच्या वडिलोपार्जित जमीन
गावातला सावकाराच्या घशात जातात आणि देबुचे पहिले मुल हे देवीच्या कोपामुळे मरून जाते.
डेबू ह्या प्रसंगातून न
सावरत संसार आणि बायको आणि आईला त्यागून गावागावातून भटकणारा एक गोसावी होतो त्याचे प्रवचन ऐकायला लोक
गर्दी करतात आणि देबुचा गाडगे महाराज होतो महाराज भोळ्या भाबड्या गरीब समाजतल्या घटकाला दारू तमाशा मास खाणे, अंधश्रद्धा ह्यापासून
दूर राहण्याचा आणि शिक्षित होऊन श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवितो बाबा लोकांच्या साठी
वर्गणी जमा करून घरे बांधून देतो त्यांच्या पाण्याची सोय करतो अस्पृश्यांचे निर्मुलन करतो त्यांची ख्याती गांधी ते आंबेडकर ते मंत्रालयपर्यंत
पोहचते.
|
बाबांचे शेवटच्या प्रवचनाचा प्रसंग मोहन जोशींनी फारच चांगला वठवला आहे.
त्याचं 'बेअरिंग' अफलातून आहे आणि त्यांचे अदाकारीचे जेवढे
कौतुक करावे ते कमीच.
बर्याच वर्षापूर्वी डॉक्टर श्रीराम लागूने 'देवकी नंदनगोपाला'
ह्या चित्रपटात महाराजांची भूमिका फारच अफलातून रित्या अभिनित केली होती.
त्याची आठवण मोहन जोशी करून देतात.
इतर कलाकारांमध्ये मधु कांबीकरांची आईची आणि अश्विनी एकबोटेची बायको लक्षात राहते.
रवींद्र बेर्डे,
रवी पटवर्धन,
भारत गणेशपुरे चांगली साथ देतात. अशोक पत्कींचे संगीत भक्तिरसात समरसून आहे पण 'लावणीचे'
गाणे हे जबरदस्तीने चित्रित केलेले वाटते.
चित्रपटाच्या तांत्रिक बाजू उत्तम आहेत.
छायाचित्रण आणि संकलन प्रभावी आहे.
कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन निलेश ह्या नवोदित दिग्दर्शकाचे खरच अभिनंदन करावसे वाटते.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उत्तम दर्शन त्यांनी आपल्या कॅमेर्यात टिपले आहे.
एक मोठ्या संताच्या श्रद्धे साठी हा चित्रपट एकदातरी पहाच.....
|
 |
|