Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
Untitled Document
मराठी चित्रपट 'एक डाव धोबी पछाड'
Ek daav dhobi pachad
निर्माते: अशोक सराफ
दिग्दर्शक: सतीश राजवाडे,
कथा, पटकथा: गिरीश जोशी
कलाकार: अशोक सराफ, पुष्कर क्षोत्री, भारत गणेशपुरे, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, संदीप पाठक, उदय सबनीस, मंगेश सातपुते,
Ashok saraf in dhobi pachad मराठीत ३०० हून अधिक आणि हिंदीमध्ये १०० हून अधिक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका केल्यानंतर अभिनेते अशोक सराफ आता एका नव्या भूमिकेत म्हणजेच निर्मात्याच्या भूमिकेत आले आहेत. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच त्यांनी हा डाव मांडला आहे 'एक डाव धोबी पछाड' या नव्या चित्रपटाचा. या डावात कर्णधार आहेत ते स्वतः. या चित्रपटात त्यांनी साकारला आहे एक डॉन - दादा दांडगे. गावात त्याची फार वट आहे. पण गावात शाळा उभारण्यासाठी आलेल्या एका बाईला जेव्हा दादांचे गुंड समजाऊ शकत नाहीत तेव्हा दादाच तीची खबर घ्यायला निघतात आणि ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून त्याची तरुण पणातली प्रेयसी हेमा (किशोरी शहाणे) असते.
शिक्षण अर्धवट सोडलेला, गावाकडची भाषा बोलणारा, दादागिरी करणारा हा दादा दांडगे हेमाला आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी स्वतःला बदण्याचा निर्णय घेतो व आपले सगळ्या काळ्या धंद्याची वाटणी त्याच्यासाठी काम करणार्‍या गुंडामध्ये वाटतो. पण त्याच्या ह्या निर्णयात काही अडथळे येतात तर तो या कामासाठी काही जणांची
मदत पण घेतो. त्यापैकीच दादांचा इंटरनॅशनल टेलर ( ------) आणि मराठी सुधरवण्यासाठी दादांनी बोलवलेला मराठीचा प्राध्यापक परखडकर (सुबोध भावे) होय.

सुबोध भावेने या भूमिकेत धमाल उडवून दिली आहे. दादांच्या मुलीच्या भूमिकेत मुक्ता बर्वेचे नखरे आणि लग्न करुन विदेशी जाण्यासाठी केलेली तिची नाटकं चित्रपटात आणखी मजा आणतात. दादांच्या अकाऊंटंट असलेला त्रयंबक व त्याची नागपूरची भाषाशैली आत्मसात करत प्रसाद ओकने उत्तम रंगवला आहे. त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेतली सायली (मधुरा वेलणकर) लक्षात राहते. दादांचा विरोधक आणि या दोघांच्या मागावर असलेला पोलिस इन्स्पेक्टर आणि त्याचा एक गुप्तहेर. व इन्स्पेक्टरकडे बढतीचा आग्रह धरणारी त्याची बायको या सगळ्या व्यक्तीरेखा आपल्याला चित्रपटात वेगवेगळ्या वळणावर भेटतात.

या डावातले मुख्य खेळाडू आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे, अर्धा डाव जिंकला आहे पटकथेच्या जोरावर गिरीश जोशी यांनी. पुण्याच्या किरण यज्ञोपवित यांचे संवाद आणि सुरेश देशमाने यांचे छायाचित्रण या डावाची जमेची बाजू आहे. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं चित्रपटाचं शिर्षकगीत षटकार ओढून जातं.

या चित्रपटात पुष्कर क्षोत्री, भारत गणेशपुरे, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, संदीप पाठक, उदय सबनीस, मंगेश सातपुते, कमलाकर सातपुते या सर्वांनीच आपापला वाटा उचलला आहे.
दादांच आणि हेमाचं प्रेमप्रकरणाचा भूतकाळ दाखवण्यासाठी अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांच्या 'माझा पती करोडपती' या चित्रपटातील 'अगं हेमा' या गाण्याचा वापर डोकॅलिटीने केला आहे.
या डावाची जमेची बाजू या डावाचा उपकर्णधार चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या- निवेदिता सराफ. वेशभुषेपासून चित्रपटातल्या प्रत्येक गोष्टीत निवेदिताचा प्रभाव दिसून येतो.
हा डाव तर दादांनी जिंकला. कसा? ते पाहण्यासाठी नक्कीच हा चित्रपट पहायला हवा.

Rating: rating41/2 by Chetana © MMW 2008




मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.