Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
चित्रपट परीक्षण
 
Faqt Ladh Mhana
प्रस्तुती, निर्माते: ग्रेट मराठा एन्टरटेन्मेंट कंपनी, ट्विंकल ग्रुप आणि मिराह एन्टरटेन्मेंट
दिग्दर्शक:
संजय जाधव
कथा:
महेश मांजरेकर
छायाचित्रणः
संजय जाधव
संगीत:
अजित- समीर,
कलाकार:
सचिन खेडेकर, संजय नार्वेकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिकेत विश्वासराव, सक्षम कुलकर्णी, मनवा नाईक, क्रांती रेडकर, संतोष जुवेकर, वैभव मांगले, अमृता खानविलकर, नागेश भोसले, हेमांगी कवी, भालचंद्र कदम.
'फक्त लढ म्हणा' - मराठी सिनेसृष्टीचा कायापालट करणारा चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टी हिंदी सिनेमाप्रमाणे तगडी कमाई करु शकणारा यशस्वी मसाला चित्रपट बनवू शकत नाही असा जर आपला समज असेल तर  तो समज खोटा ठरवण्यासाठी सज्ज आहे महेश वामन मांजरेकर निर्मित व संजय जाधव दिग्दर्शित नवा चित्रपट 'फक्त लढ म्हणा !'

एखाद्या यशस्वी हिंदी चित्रपटात ज्या खुबी असतात त्या सर्व या चित्रपटात आहेत. त्यामुळे हि फिल्म नि:संशय 'हिट' ठरेल याबद्दल वाद नाही. भरीला शेवटच्या भागातील धामधूम व हाणामारी एखाद्या दक्षिणात्य चित्रपटात शोभेल अशीच आहे. पण आपण हेही जाणतोय की बहुदा यशस्वी हिंदी मसाला चित्रपट हे दक्षिणात्य चित्रपटांवरच बेतलेले असतात.

या चित्रपटातील पाच प्रमुख हिरो - भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिकेत विश्वासराव, संतोष जुवेकर व संजय नार्वेकर यांनी अशी काही धमाल केली आहे कि निर्माते महेश मांजरेकर वेगळ्या नावाने हा चित्रपट हिंदीतही आणायचा विचार करु शकतील.
 
आजकाल आपण पाहतोय कि काही राजकीय पुढारीच सामान्य जनतेसाठी खलनायक ठरत आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात उद्योगमंत्र्याच्य गावात 'सेज' (स्पेशल इकॉनॉमिक झोन) येणार अशी बातमी येते व त्यामुळे तिथल्या जमिनींचे भाव साहजिकच वाढणार असतात. याचा फायदा घेण्याकरिता उद्योगमंत्री मधुसूदन पाटील (सचिन खेडेकर) व त्यांचा गावात राहणारा धूर्त भाऊ (भास्करराव पाटील) (संजय खापरे) स्थानिक सावकार कुलकर्णी (वैभव मांगले) याच्या मदतीने शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावायचा प्रयत्न करतात. जमिनी विकू नका असा शेतकर्‍याना सल्ला देणार्‍या शिक्षकाची हत्या करण्यात येते. तसेच स्वत:ची सरकारकडून बक्षिस मिळालेली आठ एकर जमीन विकण्यास नकार देणार्‍या माजी सैनिकाला गंगाधरला (सतीश पुळेकर) फासावर लटकावून त्याने आत्महत्या केली असे जाहिर करण्यात येते. तो फासवर लटकत असतानाच कुलकर्णी विकीपत्रावर त्याचा अंगठा उठवतो. त्याचे हे कृत्य सैनिकाचा मतिमंड मुलगा पाहतो पण त्याच्यावर
Mahesh Manjrekar, Sanjay Khapre, Siddhu
कोणी विश्वास ठेवत नाही. त्यानंतर मुलाचा मामा त्याला मुंबाईत त्याचा चुलतभाऊ तुकाराम (भरत जाधव) याच्याकडे घेऊन जातो. भरत जाधव बाबुभाई (महेश मांजरेकर) या दादाच्या पाच चेल्यांपैकी एक. हे पाचही अट्टल गुन्हेगार म्हणजे आपले पाच हिरो मग कुलर्णीचा बदला घेण्यासाठी गावी जायचे ठरवतात. उद्योगमंत्र्याचा या सर्व प्रकरणातील सहभाग माहित नसल्यामुळे ते त्याचा भाऊ भास्करराव व कुलकर्णी यांच्याशी सामना देतात.

पण त्यामुळे उद्योगमंत्री डाव रचून त्यांना पोलिसांकरवी पकडून चोप देववतो. व गाव सोडून जाण्यास भाग पाडतो. पण ते पाचजण गाव सोडायच्या तयारीत असतानाच आणखी एक दु:खद घटना घडते व त्यामुळे हे पाचजण, उद्योगमंत्री, त्यांचा भाऊ व कुलकर्णी या तिघांना संपवायची शपथ घेतात. त्यासाठी ते कशी योजना आखतात व त्यात कसे यशस्वी होतात याची रक्तरंजित कहाणी चित्रपटाच्या उत्तरार्धात येते. चित्रपटाचा शेवटही अत्यंत उत्कंठावर्धक असाच आहे.

दिग्दर्शक संजय जाधव यांनी चित्रपट अतिशय कौशल्याने हाताळला आहे. रक्तरंजित दृश्यांबरोबर काही भावनिक प्रसंग आणि कानफाट्या (संजय नार्वेकर) व वेस्ट इंडीज (सिद्धार्थ जाधव) यांच्या संवादातील चित्रपटगृहात हशा पिकविणारे विनोद चित्रपटाचा ताण हलका करतात. भरत जाधव यांची भूमिकागंभीर स्वरुपाची आहे. त्याची प्रेयसी (क्रांती रेडकर) हिला भास्करराव पाटलांबरोबर लग्न करण्यासाठी भाग पाडले गेलेले असते. तुकाराम (भरत जाधव) व ऍलेक्स (अनिकेत विश्वासराव) यांचे परस्परातील मतभेद त्यांच्या संवादात चुरचुरीतपणा आणतात. अनिकेतने ऍलेक्सची भूमिका अतिशय तन्मयतेने साकारली आहे. संतोष जुवेकरने साकारलेला 'सलीम' छाप पाडून जातो. महेश मांजरेकरांनी 'डॉन' स्वतःच्या खास शैलीत रंगविला आहे.

क्रांती रेडकरची भूमिका तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे आणि ती तिने छान वठवली आहे. सचिन खेडेकर व संजय खापरे यांनी उद्योगमंत्री व त्याच्या बेरकी भावाची भूमिका जिवंत केली आहे. अमृता खानविलकरची लावणी व मानसी नाईकचा मुजरा चित्रपटाच्या मसालेदार फॉर्म्युलात रंगत आणतात. सक्षम कुलकर्णीने मतिमंद मुलाची भूमिका समर्थपणे साकार केली आहे.

चित्रपटाचे छायाचित्रण नेत्रसुखद आहे. संगीतही चांगले आहे. पार्श्वसंगीतही चित्रपटाच्या गतीला साजेसेच आहे. चित्रपट नकळत एक संदेश देऊन जातो कि राजकिय नेते जर असेच बेताल वागत राहिले तर एक ना एक दिवस क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही.

एकंदरीत 'फक्त लढ म्हणा' हा चित्रपट सर्वार्थाने चित्रपट्गृहाकडे गर्दी खेचण्याची क्षमता असलेला मनोरंजक चित्रपट आहे.

  
उल्हास शिर्के © मराठीमुव्हीवर्ल्डसाठी



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.