Untitled Document
Change Language: English  | Thursday, March 11, 2010
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता सिनेमा परीक्षण मुलाखत
 
 
Untitled Document
चित्रपट परीक्षण
Jogwa
• जोगवा- अंधारातल्या समाजावर प्रकाश
काळ बदलला, जग बदलले तरीही काही गावे नकाशावर तशीच राहतात, त्यांच्यावर न सुधारलेल्या रस्त्यांच्या खुणा ना सुधारलेल्या माणसांच्या खुणा. वर्ष न वर्षे ही गावे अशीच राहतात, परंपरांना चिकटून....पूर्वापार चालत आलेल्या या रूढी, प्रहता, परंपरा माणसाला आतून फक्त पोखरत जातात...त्याच्या नकळत. माणसाचे निसर्गदत्त स्वातंत्र्यही हिरावून घेतले जाते बर्‍याचदा. ... अधिक वाचा

Rita
• 'रिटा': स्त्रीमनाचा वेगळ्या वाटेनं घेतलेला वेध.
नुकताच प्रदर्शित झालेला 'रिटा' हा रेणुका शहाणे दिग्दर्शित चित्रपट. पदार्पणातच रेणुका शहाणेनं आपल्या दिग्दर्शनाची चुणूक दाखवलेली आहे. शांता गोखलेंच्या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट अगदी वेगळ्या पद्धतीने एक प्रगल्भ विषय हाताळतो.
... अधिक वाचा

Agnidivya
• अग्निदिव्यः नियतीचा लपंडाव
चि. त्र्यं. खानोलकर यांच्या 'अगोचर' या साठच्या दशकातील कादंबरीवरील हा चित्रपट खानोलकरांचे त्या काळातील कोणतेही लेकन झपाटून टाकणारे असे. 'अगोचर' ही त्यापैकी एक कथा. कोकणातील एका खेडयात घडणारी. आनंदराव देसाई (मोहन जोशी) यांच्या वाडयात घडणारी. देसाई यांचा गावात इतका दरारा आहे की कोणीही त्यांच्याविरुद्ध ब्र काढू शकत नाही.
... अधिक वाचा

Gabhricha Paus
• गंध : आयुष्यातील गुंतागुंतीचा
गंध मध्ये सचिन कुंडलकर याने तीन कथा स्वतंत्रपणे दाखवल्या. या तीन कथा बांधून ठेवणारे एक सूत्र आहे, ते म्हणजे गंध, सुवास. लग्नाच्या वयाची मुलगी ही पहिली कथा तर सदाशिव पेठेतील साठच्या दशकातील घराघरात चाललेल्या कुटुंबनाटयाची जशीच्या तशी मांडलेली कहाणी. पण तिला एक रंगतदार डूब आहे. ब्राम्हण मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी,
... अधिक वाचा

Gabhricha Paus
गाभ्रीचा पाऊस : कथा आणि व्यक्तिरेखा यात सरस
प्रशांत पेठे निर्मित आणि सतीश मनवर दिग्दर्शित गाभ्रीचा पाऊस या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि व्यक्तीरेखांची घट्ट वीण पहता त्याला विविध ठिकाणी मिळालेल्या सर्वोत्कृष्टतेच्या पारितोषिकांबद्दल आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्रात काही काळापूर्वी घोंगावत असलेल्या कर्जबारी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या घटनांची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात निसर्गाच्या लहरीवर व माणसांच्या जिद्द आणि नाकर्तेपणा या दोन्हींवर सकस कथेच्या आधारे प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट केवळ मराठीच नव्हे तर सर्वभाषीय प्रेक्षकांनी पहावा असा आहे.
... अधिक वाचा
चित्रपट:    
Marathi Play

 
Untitled Document
मुख्य पृष्ठ| संपर्क