Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Thursday, February 09, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
HTML clipboard HTML clipboard Untitled Document
'जेता' - अन्यायाविरुद्ध जोरदार लढा

प्रस्तुती: रमेश देव प्रॉडक्शन प्रा. लि. आणि लोकमत एन्टरटेन्मेंट
कार्यकारी निर्माता: जितेंद्र कुलकर्णी
दिग्दर्शक: अजिंक्य देव, अमोल शेटगे
कथा: अजिंक्य देव
छायाचित्रणः धनंजय कुलकर्णी
संगीत: वैशाली सामंत
कलाकार: रमेश देव, सीमा देव, अजिंक्य देव, मनवा नाईक, अनिकेत केळकर, अथर्व उंडले, हेमांगी महाबळेश्वरकर, संदीप मेहता, प्रसाद ओक, आदित्य शाह, रणजीत जोग, कौस्तुभ दिवाण, शरद पोंक्षे

सध्या आपल्या देशापुढील मोठी समस्या अशी आहे की वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा घालायचा. मद्यधुंद अवस्थेत कुणाचाही खुन करुन सहिसलामत सुटणारी 'बडे बापकी औलाद' आपण पाहतो. आज हे सर्व पहायचे, वाचायचे आणि उद्या सर्व विसरुन जायचे या खेरीज आपण काहीच करत नाही. परंतु ज्यांना हे प्रत्यक्ष  सहन करण्याची पाळी येते, त्यांना व त्यांच्या निकटवर्तियांनाच माहित असावे गुन्हेगारांना योग्य शासन न मिळण्याचे दु:ख!

रमेश देव फिल्म्स व लोकमत एन्टरटेन्मेंट प्रा. लि. यांनी सादर केलेला नवा चित्रपट 'जेता' अशाच एका हताश झालेल्या आई- वडिलांची कथा घेऊन आलेला आहे. प्रो. यशवंत राजाध्यक्ष व सौ. राजाध्यक्ष ( रमेश देव आणि सीमा देव) यांची कन्या श्वेता (मनवा नाईक) हिचा खून तिच्या वडिलांदेखत तीन तरुण करतात आणि कोर्टात त्यांची निर्दोश मुक्तता होते.

पुढे सुप्रिम कोर्टात अपिल करण्याऐवजी ते एक वेगळा मार्ग अवलंबीतात केवळ बदला घेण ही एकच इच्छा त्यांच्यापुढे असते. त्यानुसार योग्य योजना आखून ते तीनपैकी दोघांचा खून करण्यात यशस्वी होतात. पुराव्याअभावी पोलिसांनाही कोणाला अटक करता येत नाही. संशयाची सुई मात्र कळंबी गावातील समाजसेवक- प्रभाकर (शरद पोंक्षे) वर जाते. कारण प्रभाकरचा HTML clipboard SRZ ला विरोध असतो श्वेताला याच गावामध्ये डॉक्युमेंटरी फिल्म बनविण्यासाठी त्याने मदत केलेली असते.

झालेल्या दोन खुनांचा तपास करण्यासाठी ए सी पी विक्रांत मराठे (अजिंक्य देव) केस हाती घेतो आणि त्याबरोबरच श्वेताची केसही पुन्हा ओपन करतो. प्रभाकरला संशयित म्हणून अटक करुन मग तो राहिलेल्या तिसर्‍या तरुणाचे (प्रसाद ओक) पोलिस प्रोटेक्शन काढून घेतो. नेमकी हीच वेळ साधून प्रो. राजाध्यक्ष आपला डाव साधण्यास बाहेर पडतात. पण नेमके आयत्यावेळी अडचणीत येतात. त्यांच्या मदतीला तिसरी व्यक्ती येते.

आपले मिशन पूर्ण केल्यावर प्रो. राजाध्यक्ष आणि सौ. राजाध्यक्ष मनमोकळेपणाने समुद्रकिनारी फिरतात. याचवेळी ते प्रेक्षकांशी संवाद साधतात. 'जर न्यायव्यवस्था भक्कम असेल तर गुन्हे घडतीलच कशाला?" शेवटी ते सर्वांना सांगून टाकतात "अन्यायाला पुढे येऊन विरोध करा. तुमची लढाई निर्भयपणे लढा आणि जेता' म्हणवून घ्या."

सध्याच्या स्थितीत जेव्हा आपण अट्टल गुन्हेगारांना शिक्षेला हुलकावण्या देतांना पाहतो तेव्हा खरोखरच विचार पडतो, यांना जागीच गोळ्या का मारत नाहीत. अतिरेक्यांना फेक एनकाऊंटरमध्ये मारणेच योग्य आहे का, या प्रश्नाचे उत्तर हा चित्रपट पाहिल्यावर मिळते.

सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय. अजिंक्य देव- अमोल शेटगे यांचे चांगले दिग्दर्शन, योग्य रितीने साकार केलेली पटकथा व त्याला साजेसे संवाद हेच 'जेता' या चित्रपटाचे वैशिष्ट्य. एकूण काय तर बर्‍याच दिवसांनी एक सनसनाटी विषयावरील 'ऍक्शन' चित्रपट पाहण्याची संधी मराठी चित्रपटरसिकांना 'जेता'द्वारे मिळाली
 
दर्जा: उल्हास शिर्के©मराठीमुव्हीवर्ल्डसाठी



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.