Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, February 11, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
Untitled Document
'झाले मोकळे आकाश'

प्रस्तुती: राजेंद्र अनंत
निर्माता: सुवर्णा राजेंद्र
कार्यकारी निर्माता: ज्ञानेश ढोके
दिग्दर्शक: राजेंद्र अनंत, योगेश महाजन
कथा: राजेश अनंत
छायाचित्रणः मंगेश सावंत
संगीत: निर्मल कुमार
कलाकार सुबोध भावे, पल्लवी वैद्य
मुल दत्तक घेण्यावरुन आत्तापर्यंत बरेच मराठी चित्रपट आले पण जर दत्तक घेतलेले मुल काही कालावधीनंतर मंदबुद्धी बालक असल्याचे कळले तर त्याचा परिणाम दत्तक घेणार्‍या दांपत्यावर कसा होतो या गोष्टीची जाणिव करुन देणारा चित्रपट म्हणजेच 'झाले मोकळे आकाश'

चित्रपटातील तरुण जोडपे समीर (सुबोध भावे) आणि नेहा (पल्लवी वैद्य) यांना बरीच वर्षे मुल होत नसते. नेहाच्या हट्टापायी समीर मुल दत्तक घेण्यास तयार होतो. पण जेव्हा काही दिवसांनी डॉक्टरांच्या तपासातून त्याला हे कळते की त्यांनी दत्तक घेतलेली (मुलगी) बाहुली ही मतिमंद बालक आहे तेव्हा मात्र समीर खुपच अस्वस्थ होतो. नेहा मात्र स्वतःला सावरुन एका आदर्श मातेप्रमाणे आपल्या बाहुलीची योग्य काळजी घेते.
बाहुली जसजशी मोठी होते, तसा समीर तिचा जास्तच राग करतो. एके दिवशी तर तो चक्क टोकाची भूमिका घेतो; ज्याचा त्याला नंतर पश्चाताप होतो. सात वर्षांची बाहुली आपल्या हुशारीद्वारे एक दिवस समीरचे मन जिंकते. कर्तृत्ववान बाहुलीला चित्रपटात रोल मिळवून देण्यासाठी निर्मात्याच्या रुपात शरद पोंक्षे येतो. सर्व काही सुरळीत चालले असताना बाहुलीची जन्मदाती आई अवतरते आणि तिही एका सिनेतारकाच्या रुपात. बाहुलीच्या कस्टडीचा प्रश्न कोर्टापर्यंत जातो. डिफेन्स लॉयरच्या रुपात रमेश भाटकर प्रवेश करतो आणि चित्रपटास वेगळेच वळण मिळते.
तर अशा या दर्दपूर्ण कहाणीची मांडणी दिग्दर्शक राजेंद्र अनंत आणि योगेश महाजन यांनी योग्यप्रकारे केली आहे. सुबोध आणि पल्लवीचा सुरेख अभिनय व त्याला इतर कलाकारांची साथ यामुळे चित्रपट वास्तववादी बनला आहे. एक चांगला संदेश या चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोहोचतो. काही शुल्लक त्रुटी वगळता हा चित्रपट योग्य प्रकारे हाताळला आहे. संगीतात विशेष असे काही नाही. फक्त एक लहान मुलांवर चित्रित गाणे योग्य वाटते.

दिग्दर्शकाने चित्रपट अत्यंत प्रगल्भ, संवेदनशील पातळीवर हाताळला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट यशस्वी व्हायला हरकत नाही....
 
दर्जा: उल्हास शिर्के©मराठीमुव्हीवर्ल्डसाठी




मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.