|
प्रस्तुती: 'ब्रम्हा व्हिजन'
निर्माते: सुर्यकांत सुर्यवंशी आणि हरिश सपकाळे
दिग्दर्शक: विजय सातघरे
पटकथा: जयंत पवार, महेश मांजरेकर
छायांकन: अनिल खांडेकर
कलाकार: भरत
जाधव, दीपाली सय्यद, बिपीन शिर्के, गणेश दिवेकर, विजय चव्हाण, जनार्दन परब,
जयराज नायर, दीपक शिर्के, उषा नाडकर्णी, गणेश दिवेकर, रवींद्र बेर्डे,
दिगंबर नाईक |
|
भरत जाधव आणि दीपाली सय्यद हि जोडी बरीच लोकप्रिय आहे आणि त्यांचा नवीन
चित्रपट 'काळशेकर आहेत का?' हा एक धमाल विनोदी थरारपट झालेला आहे.
ब्रम्हा
व्हिजन प्रस्तुत आणि निर्माते सुर्यकांत सुर्यवंशी आणि हरिश सपकाळे निर्मित
'काळशेकर आहेत का?' या चित्रपटाची कथा ही एका अशा जोडप्याची कथा आहे जे पळून जाऊन
लग्न करतात आणि त्यांच्या मागे मुलीचे (दीपाली सय्यद) पोलीस
इन्स्पेक्टर मामा (बिपीन शिर्के), होणारा पती (गणेश दिवेकर), आणि एक श्राद्धाचे
पंडित (रवींद्र बेर्डे) लागलेले असतात. |
 |
अशा परिस्थितीत पैसे नसताना ते एका
सुनसान बंगल्यात राहतात जिथे त्यांना एक वृद्ध करोडपती म्हातारा (विजय चव्हाण)
त्यांना गळ घालतो कि त्याला आपल्या लालची नातेवाईकांपासून खुनाची संभावना आहे आणि
पराग लेले (भारत जाधव) जो एक वकील आहे त्याला वाचविण्यासाठी एक युक्ती करतो आणि
काळशेकर ह्याच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवून घेतो. काळशेकर मेले असून त्यांचे
मृत्युपत्र वाचून सांगतो कि काळशेकरांवर बरेच कर्ज आहे. आणि म्हणून सगळे नातेवाईक
घरी परततात. पण काळशेकरांचा मित्र (जनार्दन परब) हा काळशेकरांना पोचविण्यासाठी
तिरडी बांधतो आणि मग सगळी धमाल सुरु होते. आणि नंतर काळशेकरांचा खरच खून होतो आणि
खुनाचा आरोप परागवर लावला जातो.
|
पण पराग खरा खुनी आहे का? खरा खुनी कोण
आहे? हे सगळे प्रश्न चित्रपटात चांगल्या रीतीने गुंफलेले आहेत. चित्रपट
उत्कंठावर्धक झालेला आहे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक विजय सातघरे
यशस्वी झालेले आहेत. त्यांना चांगली साथ मिळाली आहे ती भरत जाधवांच्या अप्रतिम
अभिनयाची आणि दीपाली सय्यदच्या लाजवाब अदाकारीची. विजय चव्हाणांचा काळशेकर यादगार
झालेला आहे. जयराज नायर ह्यांनी सुपारी खुनीच्या भूमिकेत धमाल उडवून दिलेली आहे.
दीपक शिर्के, उषा नाडकर्णी, गणेश दिवेकर, जनार्दन परब, रवींद्र बेर्डे, दिगंबर नाईक
ह्यानी चांगली साथ दिलेली आहे. संजय नार्वेकरांचा आयटम साँग जबरदस्त. अनिल पवारांचे
लेखन चांगले आहे. अनिल खांडेकर ह्यांचे छायांकन चांगले झालेले आहे. चिनार महेश
ह्यांचे संगीत मधुर आहे. खास करून 'पावसाळी'गाणे आणि आयटम साँग चांगले झालेत.
कुणाल-पंकज चे संकलन चित्रपटाला वेग देते.
एकंदर चित्रपट चांगला करमणूक
प्रधान झालेला आहे. पहाच! हिंदीतला प्रियदर्शन मराठीत पहा ! |