Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, February 11, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
लालबाग  परळ - सामाजिक प्रश्नावरचा चित्रपट!
Lalbaug Paral
प्रस्तुती: दार मोशन पिक्चर्स.
निर्माते: अरुण रंगाचारी.
दिग्दर्शक: महेश मांजरेकर.
पटकथा: जयंत पवार, महेश मांजरेकर.
संगीत: अजित-समीर.
कलाकार: सतिश कौशिक, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, वीणा जामकर, विनीत कुमार, समीर धर्माधिकारी, सचिन खेडेकर, कश्मिरा शाह, गणेश यादव, करण पटेल, शशांक शेंडे, सीमा विश्वास.
फार कमी दिग्दर्शक आपल्या चित्रपटामधून वास्तव चित्रित करतात. महेश मांजरेकर हे अशेच एक दिग्दर्शक. त्यांचा 'लालबाग परळ 'हा चित्रपट ऐंशीच्या दशकात झालेली गिरणीकामगारांचा अयशस्वी ठरलेला वादग्रस्त संप ह्यावर बेतलेला आहे. मिल मालक खैतान (किशोर प्रधान) आणि त्यांचा कुकर्मी जावई (समीर धर्माधिकारी) हे कामगारांना कामावरून कमी करून आणि त्यांचे पैसे बुडवून मिलची जमीन जास्त भावात काढायला बघतात पण कामगार नेते - डॉक्टर (वैभव मेंगळे) आणि त्यांचे कॉम्रेड (कामगार बंधू) सचिन खेडेकर आणि विनय आपटे कामगारांच्या बाजूने लढून मिल मालकांशी झगडा देतात पण भांडवलशाही विरुद्ध सगळे प्रयत्न फसतात आणि भूक, तहान, पैसे, दारिद्र्य, गुन्हेगारी ह्यांनी ग्रासलेले कामगार शेवटी आपल्या जमिनी आलेल्या भावात विकून मिल मालकांना मालामाल करतात.
गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, मंदार देवधर, रेणुका दफ्तारदार, पण मिल मालकांना पण 'भाई' लोकांपासून भीती आणि गोळ्यांचे वर्षावापासून कोणी वाचवू शकत नाही. ही सगळी कहाणी बाबा (अंकुश चौधरी) एक नाट्यकर्मी आपल्या मैत्रिणीला (अनुषा दांडेकर) सांगतो आणि आपल्या दोन  भाऊ  नारू (सुपारी भाई-करण पटेल), त्याचा खास मित्र स्पीड्ब्रेकर (सिद्धार्थ जाधव) आणि बहिण (विना जामकर) आणि बँकेत रोखपाल (विनीत कुमार) ह्यांची गोष्ट सांगतो. कामगारांचे हाल, त्यांची पैशाची  कोंडी, खाण्यापिण्याचे प्रश्न, गुन्हेगारी कडे वळलेली  नवीन पिढी, मुलींचे लैंगिक शोषण, पुढार्‍यांचे प्रश्नावर लक्ष न देणे, हे सगळे जयंत पवार ह्या पत्रकारांच्या नाटकावर आधारित पटकथा आहे. अभिनयात सीमा विश्वासने आईची भूमिका चांगली वठवलेली आहे. कामगार नेत्याच्या दमदार भूमिकेत विनय आपटे आणि सौम्य सचिन खेडेकर शोभले आहेत.
अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, करण पटेल, गणेश यादव (पार्श्याभाई), श्याम माशाळकर(वाणी ) ह्यांची पण कामे चांगली झाली आहेत .सतीश कौशिक चा 'मामा'आणि काश्मिरा शाहची 'मामी 'जरा 'रिलीफ 'देतात. विणा जामकर चे काही दृश्य खटकतात. अजित-समीर ह्यांना संगीतासाठी वाव नाही. अजित रेडी ह्यांचे छायाचित्रण विषयाला साजेसे झालेले नाही आणि फारच भडक रंगात  आणि भडक 'रोषणाई' मध्ये झगमगीत झालेले आहे. संकलन जरा वेगवान असते तर चित्रपट एखाद्या मालिके सारखे दिसला नसता. चित्रपटातील चाळीचे सेट खरे वाटतात पण मिलचे सेट हास्यास्पद वाटतात.

- संदीप हट्टंगडी © मराठीमुव्हीवर्ल्ड 2010




मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.