Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Thursday, February 09, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
HTML clipboard HTML clipboard HTML clipboard Untitled Document
'पारध'

प्रस्तुती: अमोघ सिनेटोन्स
निर्माती: अनुराधा तलाठी
दिग्दर्शक: गजेंद्र अहिरे
कथा: गजेंद्र अहिरे
छायाचित्रणः चंद्रशेखर अय्यर
संगीत: राहुल रानडे
कलाकार: सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, हेमांगी कवी- धुमाळ, रवि काळे, वृंदा गजेंद्र, विनय आपटे, अमोघ  तलाठी, विठ्ठल उमप, मिलिंद शिंदे
मराठी चित्रपट पुन्हा एकदा जुन्या वळणावर येण्याची चिन्ह दिसत आहेत. आता फरक एवढाच की पुर्वीच्या जमीनदार आणि सरपंचाची जागा आता संधीसाधू राजकिय नेत्यांनी घेतली आहे. त्यांचा हेतू एवढाच की गावातील तरुण मंडळी निवडून काढायची व त्यांचा उपयोग गुंडगिरीसाठी करुन घ्यायचा. राजकीय पाठबळाच्या जोरावर त्यांना पाठिशी घालायचे व योग्यवेळी त्यांचा काटा काढायचा.

गजेंद्र अहिरे यांचा नवा चित्रपट 'पारध' याच पार्श्वभूमीवर आधारीत आहे. या चित्रपटातून अशा गावातील भरकटलेल्या तरुणांना एक चांगला मेसेज दिला गेला आहे.

अंबादास (मकरंद अनासपुरे) आणि त्याचा सहकारी बाप्पा (मिलिंद शिंदे) हे गावातील काही कामधंदा करत नसलेल्या तरुणांना दारु-चिकन व पैशाची चटक लावून त्यांच्या दहशतीचा वापर करतात. आपल्या बळाच्या जोरावर अंबादास प्रथम आपल्याच पार्टीतील  नेत्याच्या (विनय आपटे) हातातून सहकारी दुध संस्था काबीज करतो. पुढे तो त्यासाठी तो पार्टी प्रमुखांनाच आव्हान देऊन त्यांचे सर्व गैर धंदे उघडकीस आणतो. पुढे तो त्यासाठी मदत घेतो ती यशवंत (सिद्धार्थ जाधव) नावाच्या डेअरींगबाज तरुणाची. पार्टी प्रमुखाला उघडे केल्यावर मात्र तो आपला स्वार्थ साधतो व यशवंतला त्यांच्या हवाली करण्याची बोली करुन बाकी सत्ता आपल्या हातात घेतो.

अंबादासच्या या सर्व चालींमुळे यशवंतच्या वारकरी कुटुंबावर विपरीत परिणाम होतो. त्याचे वृद्ध वडील (विठ्ठल उमप), मोठा भाऊ (रवि काळे) जो शेती करतो, त्याची पत्नी (वृंदा गजेंद्र), बहिण (हेमांगी कवी-धुमाळ) हे सर्व अडचणीत येतात. फक्त छोटा भाऊच योग्य मार्गाला लागतो. चित्रपटातील कथाही हा छोटा भाऊच सुत्रधार म्हणून सांगतो

चित्रपटाची मांडणी योग्य आहे व त्याची सुरुवातही चांगल्या पद्धतीने होते. वास्तववादी दृष्यांवर जास्त भर दिला आहे. पण मध्यांतरानंतर जेव्हा यशवंत एकटा पडतो व आपला जीव वाचवण्यासाठी पळत सुटतो, तो भाग मात्र खुपच लांबवला गेला आहे. संपूर्ण चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या परिपूर्ण
अभिनयाद्वारे छाप पाडली आहे. पण खरे लक्ष वेधून घेतो तो मिलिंद शिंदे. बाप्पाच्या भूमिकेत त्याने एक अस्सल खलनायक साकार केला आहे.

इतर कलाकारांमध्ये रवि काळे, वृंदा गजेंद्र, हेमांगी कवी- धुमाळ यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. विनय आपटे यांना मात्र हवी तशी भूमिका दिली गेली नाही. चित्रपटांतील तांत्रिक बाबींबद्दल बोलायचे तर, चंद्रशेखर अय्यर यांची फोटोग्राफी, राहुल रानडे यांचे पार्श्वसंगीत, व राहुल भातणकर यांचे संकलन उत्तम ठरले आहे.
 
दर्जा: उल्हास शिर्के © मराठीमुव्हीवर्ल्डसाठी



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.