Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, February 11, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
Untitled Document
मराठी चित्रपट 'रिटा'
Rita
निर्माती: पुजा शेट्टी-देवरा, आरती शेट्टी
कथा: शांता गोखले
पटकथा-संवाद-दिग्दर्शन: रेणुका शहाणे
कलाकार: जॅकी श्रॉफ, पल्लवी जोशी, डॉ. मोहन आगाशे, रेणुका शहाणे, सुहासिनी मुळे, सई ताम्हणकर, तुषार दळवी, पुष्कर क्षोत्री, मकरंद देशपांडे

'रिटा': स्त्रीमनाचा वेगळ्या वाटेनं घेतलेला वेध.

नुकताच प्रदर्शित झालेला 'रिटा' हा रेणुका शहाणे दिग्दर्शित चित्रपट. पदार्पणातच रेणुका शहाणेनं आपल्या दिग्दर्शनाची चुणूक दाखवलेली आहे. शांता गोखलेंच्या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट अगदी वेगळ्या पद्धतीने एक प्रगल्भ विषय हाताळतो.

'रिटा' ही एक उच्चभ्रू, इंग्रजी वातावरण असलेल्या घरात वाढलेली मुलगी. तिचं बालपण तिच्या आईपेक्षा व्हिक्टोरिया या तिच्या सर्व्हंटबरोबरच जातं. आईचा केवळ दिसण्यावर असलेला भर, वडिलांचा अहम् यात रिटाचं त्यांच्याबरोबरचं नातं तुटक तुटक होत जात. पुढे रिटावरच सार्‍या घराची जबाबदारी येते.

Pallavi Joshi in Rita या सगळ्या प्रवासात नोकरीचं आयुष्य जगता जगता तिला विठ्ठल साळवी भेटतो. पंधरा वर्षांनी मोठा असलेला साळवी तिला आवडयला लागतो. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात, आणि रिटाला आपलं स्वतःच जग सापडत.

पण त्यांच्या या नात्यात अनेक प्रश्न उभे राहतात. अनेकदा निर्णायक क्षण निर्माण होतात. हे नातं सहजपणे न स्विकारणारा समाज आणि कुठलंही नातं स्वच्छपणे जगण्याची रिटाची मागणी यातून बरीच प्रश्नचिन्हे या दोघांच्या समोर येतात.
रिटाची जिवलग मैत्रीण या सगळ्यात तिला मानसिक आधार देते. सरस्वती अय्यंगार रिटाच्या बालपणीपासूनची एक संवेदनशील मैत्रीण. रिटाची सख्खी बहीण संगीताही तिच्या बहरापासून पडझडीच्या काळातही साथ देत असते.

अतिशय समंजस भूमिकेतून ही कथा दिग्दर्शकीने साकारली आहे. रिटाची केंद्रवर्ती भूमिका पल्लवी जोशीने अतिशय समर्थपणे आणि सजगपणे साकारली आहे. तिच्या वडिलांची भूमिका साकारणारे मोहन आगाशे असो संगीता साकारणारी सई ताम्हणकर असो, कुठेही आपल्या भूमिकेच 'बेअरिंग सोडत नाहीत. मकरंद देशपांडेचा 'एरिक' लक्षात राहण्याजोगा. दक्षिणात्य मेकअपमधली सरस्वती साकारणारी रेणुका शहाणे बर्‍याच दिवसांनी पडद्यावर पाहतानासुद्धा तितकीच सशक्त अभिनय करणारी जाणावते.

तौफिक कुरेशीचं संगीत मन हेलावून सोडतं. या सर्वामध्ये ठळकपणे अधोरेखित होतो तो विठ्ठल साळवीची भूमिका साकारणारा जॅकी श्रॉफ. साळवीची अगतिकता त्याने अप्रतिम साकारली आहे. एकंदर चित्रपटाची दृश्ये दक्षिणात्य वातावरणाचा सुखद स्पर्श देतात.

चित्रपटाने एका वेगळ्या नात्याला संयमाने आणि प्रगल्भ स्तरावर व्यक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. मराठी चित्रपटांमध्ये हा एक नवा, उत्तम प्रयोग लोकप्रिय ठरेल असेच वाटते.

दर्जा: प्रियांका © मराठीमुव्हीवर्ल्डसाठी




मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.