मराठी
चित्रपट इतिहासात फारसे 'हॉरर'च्या पठडीतले चित्रपट फारच कमी आहेत 'पाठलाग', 'हा खेळ सावल्यांच्या', 'माझा
छकुला', 'सावरखेड एक
गाव' असे चित्रपट क्वचितच बनले पण 'स....सासूचा हा चित्रपट फारच
उत्तम भयपट झालेला आहे. कार्तिक (सुनील बर्वे)आणि अश्विनी (सोनाली कुलकर्णी {नटरंग
फेम}) हे सुखवस्तू
जोडपे
पण त्यांना मुल
होत नाही म्हणून सासर्या (विनय
आपटे) कडनं सारखे
घराण्याला वारस मिळावा अशी बोलणी खावी लागतात. नवरा
बायको मध्ये कुणामध्येही दोष
नसताना मुल होत
नाही याचा अश्विनीला पडलेला प्रश्न.
यात भर म्हणजे एक
वास्तुशास्त्र चे शास्त्री श्यामसुंदर (यतीन कार्येकर)
त्यांना त्यांच्या घराच्या समोर
असलेले जुने मोडके
घर हे एक
शापित वास्तू असल्याचे सांगतो आणि
लगेचच त्या वास्तूला तोडून
टाकून घराला वारस
मिळेल असा सल्ला
देतो.
|
पण आधुनिक विचारांचा कार्तिक ह्यावर विश्वास ठेवत
नाही पण रुढीवादी
असलेल्या अश्विनीला ह्यावर विश्वास बसतो
कारण तिला अजब
भास होतात आणि विचित्र स्वप्नेही पडतात श्यामसुंदरचा अपघात होत. जुन्या घरातल्या सासुबाईंच्या तस्वीरच्या मागे असलेले गुपित हे ती सासर्यांकडून जाणून घेते आणि नक्की
काय गौडबंगाल आहे
हे शोधण्याचा प्रयत्न करते.
तिला हे रहस्य
समजते का?
तिला
मुल होते का?
तिच्या संसाराची घडी व्यवस्थित बसते का?
तिच्या स्वप्नांच्यामागे काय
गुपित आहे?
तिच्या सासुबाईंचे काय
नेमके अपूर्ण इच्छा
आहे अशा प्रश्नांची उत्तरे ह्या
चित्रपटात चांगल्या वेगवान पटकथा
सापडतात. बेलेकर ह्यांचे दिग्दर्शन चोख
आहे आणि त्यांच्यावर राम
गोपाल वार्मांचे चित्रपट 'भूत','वास्तुशास्त्र',
'फुंक'
ह्यांचे संस्कार दिसतात.
|
 |
थोडेसे-कथानक प्रियदर्शनच्या 'भूलभुलैय्या'
वर बेतलेले आहे पण चित्रपट बघण्याजोगा झालेला आहे. मुख्य कलाकारांमध्ये
सुनील बर्वे ह्यांनी भूमिका फारच सोप्या शैलीने केली आहे.
सोनालीची भूमिका कठीण होती पण तिने ती चांगल्यारितीने पेलवली आहे.
विनय आपटे आणि शुभांगी गोखले हे दोघं सासरा-सासूच्या भूमिकेत उत्तम.
कमलेश सावंत,
क.वृषाली,
यतीन कार्येकर,
अरुण भाद्सावले आदिच्यांची चांगली साथ आहे.
ओमकार कर्वे एका छोट्या भूमिकेत भाव खाऊन जातो.
संदीप
खरेंच 'अंगाई'
गीत चांगले झाले आहे. पार्श्वसंगीत चांगले आहे.
छायाचित्रण लक्षवेधक आहे.
एका रहस्यमय चित्रपटाला जसे कलाकारांच्या अगदी त्यांच्या चेहर्यावर कॅमेरा जवळ जावा असे प्रभावी चित्रण आहे.
संकलन
गतिमान आहे.
कला
दिग्दर्शन
प्रभावी आहे आणि खास करून जुनाट घर
उत्तमरीत्या उभारलेले आहे.
एक चांगला रोमांचक थरारपट-भयपट म्हणून नक्की हा चित्रपट पाहावा.
|