जागतिकिकरणामुळे गेल्या काही काळात सर्वसामान्य माणसाचं जीवन कमालीचं बदलून गेलय. अगदी काल परवा पर्यन्त मंडईतून भाजी खरेदी करणारा मध्यमवर्गीय माणुस सहजपणे शॉपिंग मॉलमध्ये भाजी घेतोय. वडा-पावची जागा झपाट्यानी बर्गर घेतोय. या बदलांचं प्रतिबिंब लग्नसंस्थेतही न पडल्यास नवलच! जुने कांदे-पोहे जरी आजूनही तग धरुन असले, तरी ते बनवण्याच्या आणि देण्याच्या पध्दतीही कमालीचा बदल झालाय. स्त्री-पुरुष संबंध, लग्नसंस्थेतले बदल, स्त्री आणि तिचं चारित्र्यं यकडे बघण्याचा समाजाचा बदलता दृष्टीकोन या सगळ्या बदलांचा प्रगल्भ वेध घेणारा चित्रपट म्हणजे मुक्ता आर्ट्स निर्मित आणि राजीव पाटील दिग्दर्शीत चित्रपट 'सनई चौघडे.' चित्रपटाची कथा तशी साधीच आहे.
मृत्युशय्येवर असलेल्या आपल्या मावशीला उर्मिला (शिल्पा तुळसकर) आपल्या मावसबहीणीचं- सईचं (सई ताम्हनकर) लग्न करून देण्याचं वचन देते. आईच्या मृत्युनंतर एकाकी पडलेली सई उर्मिला आणि श्रिकांतकडे (तुषार दळवी) रहायला येते. आणि मग सुरु होतो श्रिकांत-उर्मिलेचा सईचं लग्नं जुळ्वण्याचा प्रयत्नं. दाखवण्याचा पारंपारिक कार्यक्रम, त्यादरम्यान घडणार्या गमतीदार घटना, आणि 'दा़खवण्याच्या' कार्यक्रमातही कालानुरुप घडून आलेले बदल यांच नर्मविनोदी शैलीत चित्रण करत कथा पुढे सरकते. दरम्यान श्रिकांत-उर्मिलेला राहुल बोरगावकरच्या (सुबोध भावे) कांदे-पोहे या आधुनीक शैलीत लग्न जमावणार्या संस्थेची माहिती मिळते. शास्त्रीय कसोट्यांवर आधारीत लग्न जुळवणारी ही संस्था मग पाचजोड्यांना घेऊन एकमेकांना जाणून घेता यावं म्हणून हील स्टेशनवर घेऊन जाते. यातील आदित्य (संतोष जुवेकर) आणि सई एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण लग्न अगदी ठारायच्या बेतात असताना सई तिच्या पुर्वायुष्यातलं एक गुपीत उघड करते. आणि मग त्यामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात वादळ उठतं. राहुल बोरगावकर मात्र सईचं लग्नं जमव्ण्याचा चंग बांधतो. अखेर सईच लग्नं होतं का? कोणाशी होतं? तिच्या पुर्वायुष्यातलं असं काय गुपीत असतं? या प्रश्नांची उत्तर देत चित्रपट संपतो.
चित्रपटातल्या सर्वच कलाकारांनी सुंदर काम केलय. विशेषतः सुबोध भावेनी रंगवलेला राहुल बोरगावकर सगळ्यांची दाद मिळ्वून जातो. संतोषनी नेहमीच्याच सह्जतेनी अभिनय केलाय. पहिल्याच चित्रपटात मिळालेल्या आव्हानात्मक भुमीकेचं सईनं चीज केलय. अगदी तुरळ्क ठिकाणी तिचा नवखेपणा जाणवतो, पण त्यापेक्षाही तिचे बोलके डोळे आणि जिवंत अभिनयच शेवटी लक्षात रहातो.
छोट्याशा भुमिकेतही चिन्मय मांडलेकरनं जान आणलीय. श्रेयसचा गेस्ट ऍपिअरन्सही भाव खाऊन जातो.दिग्दर्शक आणि कथालेखक म्हणुन राजीव पाटलांनी चित्रपटावर घेतलेली मेहनत जाणवत रहाते. आपल्या अनुभावाचा चित्रपट चांगला बनवण्यासाठी त्यांनी योग्य वापर करून घेतलाय. नर्मविनोदी शैलीतुन पुढे सरकणारी कथा मध्यांतरानंतर एकदम गंभीर बनते. पण हे स्थित्यंतर अनुभवताना प्रेक्षकांना काहिही खटकत नाही, जर्क बसत नाही. यामागे राजीव पाटलांच्या दिग्दर्शकीय कौशल्याला दाद द्यायला हवी. अवधुत गुप्तेच संगीत नव्या पिढिसाठी खुपच अपिलींग आहे.विशेषतः कांदे-पोहे या गाण्याचा तुकड्या तुकड्यातला वापर फारच प्रभावी वाटतो. पण श्रेयसचा पहीला चित्रपट आणि मुक्ता आर्ट्सचा हात या गोष्टी असताना टेक्नीकली हा चित्रपट नक्कीच जास्तं चांगला बनू शकला असता.
पदार्पणातच एक सामाजिक आशय असलेला चित्रपट बनवण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल आणि तो यशस्वीपणे पेलल्याबद्दल दिप्ती तळ्पदेंचं कौतुक करायलाच हवं. सामाजिक आशय असूनही हा चित्रपट एक कंप्लीट एंटरटेन्मेंट पॅकेज देतो, हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे आणि यशही. एकुणच हा चित्रपट किमान एकदा तरी बघायलाच हवा. |