Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Wednesday, February 22, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
चित्रपट परीक्षण : शाळा
- Chit Chat with Ketaki - Related News - Movie Stills - Movie Details
Shala Marathi Film
प्रस्तुती: दि ग्रेट मराठा एन्टरटेन्मेंट कंपनी, निषाद ऑडिओ व्हिज्युअल्स, नवलाखा आर्ट्स
निर्माते:
विवेक वाघ, निलेश नवलाखा
दिग्दर्शक:
सुजय डहाके
कथा: मिलिंद बोकिल यांच्या 'शाळा' या कादंबरीवर आधारीत
छायाचित्रणः दिएगो रोमर्रे
संगीत:
अलोकनंदन दासगुप्ता
कलाकार: दिलीप प्रभावळकर, नंदू माधव, देविका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, अमृता खानविलकर, आनंद इंगळे, गणेश मयेकर, शशांक शेंडे, स्नेहल घायाळ आणि अंशुमन जोशी,
केतकी माटेगावकर
'शाळा' - तुमच्या आमच्या आठवणीतली.

शाळा म्हटली म्हणजे प्रत्येकाला आपल्या शालेय जीवनातील कडू- गोड अनुभव आठवतात. त्या फूलपंखी आठवणी मनाच्या कप्प्यात कायम जपून ठेवलेल्या असतात. अगदी वृद्धापकाळी सुद्धा शाळेतले आपले आवडते सर व मॅडमची नावे अनेकांना सहज आठवतात. वर्गातील हुषार व वात्रट मुले-मुली आपल्या कायम लक्षात राहतात. तसेच त्या अबोध वयातील मुलामुलींना एकमेकांबद्दल व आपल्या शिक्षक-शिक्षिके बद्दल वाटणारे कुतुहल व आकर्षण सर्वांच्या परिचयाचे असते.

तर अशाच तुमच्या आमच्या आठवणींना उजाळा देणारा चित्रपट म्हणजे 'शाळा' हा चित्रपट! लेखक मिलिंद बोकिल यांनी साकार केलेल्या व संजय डहाके यांनी रंगविलेल्या यामधील व्यक्तीरेखा थोडयाफार फरकाने सर्वच शाळांमध्ये असतात, त्यामुळे चित्रपट सर्वांनाच आपलासा वाटतो. विशेषतः मराठी प्रेक्षकांना, कारण चित्रपटातील वातावरण मराठी शाळेतील आहे. या शाळेत कडक शिस्तीची इंग्रजीची शिक्षिका बेंद्रबाई (देविका दफ्तरदार) आहे. तर सुंदर दिसणारी व मुलांना आवडणारी वर्ग-शिक्षिका परांजपेबाई (अमृता खानविलकर)  आहे. दिलखुलासपणे आपल्या शिष्यांशी गप्पा मारणारे इतिहासाचे मांजरेकर सर (संतोष जुवेकर) आहेत तर कधी कठोर तर कधी मृदू वागणारे मुख्यध्यापक (दिलीप प्रभावळकर्) ही आहेत.
 
आता थोडे नववीच्या वर्गाकडे वळू. तर कान्हे गावी स्थित वर्‍हाडकर हायस्कूलमधील या वर्गात ज्या घडामोडी घडतात त्याचेच चित्रीकरण आपल्याला 'शाळा' या चित्रपटात दिसून येते. शाळेत नायक व नायिका म्हणजे  आड्नावाने ओळखले जाणारे जोशी व शिरोडकर हे त्या वर्गातील विद्यार्थी- विद्यार्थिनी. त्या दोघांमधले एकमेकांबद्दल वाटणारे कुमारवयीन आकर्षण दिग्दर्शकाने प्रभावीपणे साकारले आहे. पण चित्रपट फक्त या दोघांवरच न बेतता, जोशीचा वात्रट मित्र म्हात्रे व त्याचे 'केवडा' या टोपण नावाच्या मुलीवरील एकतर्फी प्रेम, मुंबईहून आलेल्या मुलीचे इतिहासाच्या शिक्षकावर जडलेले प्रेम व नंतर साथ न मिळाल्यामुळे तिचा आत्महत्येचा प्रयत्न, हे सर्व चित्रपटात उत्तमरित्या दाखविले आहे. चित्रपटाची पार्श्वभूमी आणीबाणीच्या काळातील म्हणजे साधारण ७५-७६ ची आहे.

चित्रपटाचा नायक जोशी हा आपल्या मामाबरोबर (जितेंद्र जोशी) जास्त मोकळेपणाने वागतो
Mahesh Manjrekar, Sanjay Khapre, Siddhu
 व त्याचा आदर्श ठेवून काही गोष्टी अशा करतो की त्यामु़ळे तो स्वतः व त्याचा मित्र म्हात्रे दोघे अडचणीत येतात. पण जोशींचे वडील समजुतदारपणे त्या दोघांची येणार्‍या संकटातून सुटका करतात. चुका सर्वांकडून होतात पण चूक झाल्याचा पश्चाताप होऊन त्यातूनच पुढे चांगले नागरीक तयार होतात असाच संदेश दिग्दर्शकाला द्यायचा असावा.

आता अभिनयाकडे वळू- प्रमुख भूमिकेतील कलाकार केतकी माटेगावकर व अंशुमन जोशी यांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. जोशीचे समजुतदार वडिल साकारण्याचा मान नंदू माधव यांना मिळाला आहे, व तो त्यांनी सहजतेने वठवला आहे. आईच्या भूमिकेत आश्विनी गिरी योग्य वाटते.

संतोष जुवेकर व जितेंद्र जोशी यांनी आपापल्या भूमिकांमध्ये विशेष छाप पाडली आहे. दिलीप प्रभावळकरांना अभिनयाचा विशेष वाव मिळाला नाही. त्याचप्रमाणे परांजपेबाई बनलेल्या अमृता खानविलकरला देखील सुंदर दिसण्याखेरीज विशेष स्कोप दिलेला नाही. आनंद इंगळे केवडाच्या बापाच्या छोट्या भूमिकेत लक्ष वेधून घेतात. पण जास्त लक्षात राहतो तो म्हात्रेची भूमिका करणारा वात्रट मुलगा चित्रपटाची नामावली फार जलद पुढे सरकत असल्यामुळे त्याचे नाव मात्र कळले नाही. चित्रपटाचे छायाचित्रण दिएगो रोमर्रे व ध्वनीमुद्र्ण ख्रिस्तोफर हार्वे या निष्णात परदेशी तंत्रज्ञांनी केल्यामुळे चित्रपटाच्या युनिव्हर्सल अपिलमध्ये भर पडली आहे.

एकंदरीत 'शाळा' एक उत्तमरित्या सादर केलेली कलाकृती आहे. हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य महेश मांजरेकरांच्या 'दि ग्रेट मराठा एंटरटेन्मेंटने केल्याबद्दल त्यांना धन्यवाद!
  
उल्हास शिर्के © मराठीमुव्हीवर्ल्डसाठी



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.