मराठी चित्रपट फारसे रहस्यपट नसतात पण
हल्लीच 'रिंगा रिंगा', 'रानभूल'
सारखे थरारपट चांगला धंदा करता आहेत आणि
आता विजू मानेंचा 'ती रात्र 'हा एक
चांगला थरारपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असे
वाटते.
संतोष जुवेकर आणि
अदिती सारंगधर अभिनित दोन
पात्र आपल्या मधुचंद्राच्यानंतर एकमेकांपासून दुरावतात
आणि
नवर्याला आपल्या बायकोवर परपुरुषावरून
संशय असतो म्हणून तो आपल्या बंगल्यात एक कॅमेरा
बसवून तिच्यावर पाळत ठेवून असतो.
पण बायकोला तो
कॅमेरा सापडतो आणि समजूतदार नवरा बायकोला खूप
समजाविण्याचा प्रयत्न करतो कि
त्याने तसे का
केले.
हे गूढ काय असते?
मग
अदितीला एक माथेफिरू सतावू लागतो?
तिला बंगल्यात डांबून ठेवतो.
हा
माथेफिरू कोण? तो तिला नेमका काय
विचारात असतो?
तिचा नवरा खरच
बायकोला मारण्याचा कट
करत असतो का?
बायकोच्या विम्याच्या पैशावर त्याची नजर
असते का?
हे प्रत्यक्ष चित्रपट पाहताना जाणून घेण्यात आनंद येईल.
|
 |
चित्रपट फारच उत्कंठावर्धक झाला आहे. कलाकारांमध्ये प्रसाद ओक
माथेफिरूच्या भूमिकेत अतिशय प्रभावी आहे. नवर्याच्या भूमिकेत संतोष
जुवेकरने सहज अभिनय केला आहे. कावरलेली बावरलेली बायको अदिती सारंगधरने
चांगली वटवली आहे. सुबोध भावेंचा सबनीस हे पात्र चित्रपटाच्या कथानकात का
आहे हे उमगत नाही. तसेच मंगेश देसाईंचा रोल चित्रपटात का आहे हे एक कोडे आहे.
अवधूत गुप्तेंचे संगीत ठीक आहे. पण पार्श्वसंगीत चित्रपटाच्या कथानकाला
साजेसे आहे. शब्बीर नाईकचे छायाचित्रण अतिशय प्रभावी आहे. त्यांनी मूड
फोटोग्राफीचा वापर उत्तम रीत्या केला आहे. संकलन वेगवान आहे आणि चित्रपट
कुठेही लांबत नाही. एकंदर चोखंदळ प्रेक्षकांच्यासाठी हा चित्रपट मेजवानीच
ठरेल. अवश्य बघा. |
|