Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, February 11, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
HTML clipboard HTML clipboard HTML clipboard Untitled Document
'विहीर'- एक चांगले दिग्दर्शन लाभलेली उत्तम कथा!

प्रस्तुती: सरस्वती क्रिएशन, ए. बी. कॉर्प लिमिटेड
निर्माते: रमेश पुलाप्का, ए. बी. कॉर्प लिमिटेड
दिग्दर्शक: उमेश कुलकर्णी
कथा- पटकथा: गिरीश कुलकर्णी, सती भावे
संकलनः सुधीर पळसाने
संगीत: मंगेश धाकडे
कलाकार: गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, मंदार देवधर, रेणुका दफ्तारदार, डॉ. मोहन आगाशे, अश्विनी गिरी, ज्योती सुभाष, सुलभा देशपांडे.
अमिताभ बच्चन प्रस्तुत 'विहीर' हा एका वेगळ्या पठडीतला चित्रपट उमेश कुलकर्णी ह्या 'वळू' फेम दिग्दर्शकाने फार उत्तम रित्या एका संवेदनशील कथेत मांडला आहे.

समीर (मंदार देवधर) हा पुण्यात राहणारा पौगांडावस्थेत असलेला मुलगा आपल्या चुलत बहिणीच्या (अमृता सुभाष) लग्नासाठी आजोळी गावात येतो आणि आपल्या चुलत भाऊ नचिकेत (आलोक राजवाडे) ह्याला भेटून फार आनंदी होतो कारण हा भाऊ त्याचा एकदम जवळचा आणि त्याचा 'हिरो' असतो. गावातल्या एका विहिरीवर पोहताना ते आपले एकमेकांशी संवाद साधतात आणि एकमेकांच्या सुख, दु:ख, स्वप्ने, पुढच्या आयुष्याची कल्पना, वडिलधार्‍यांचे वर्तन, बहिणीचे होणारे लग्न, अशा विविध विषयांवर चर्चा करतात. समीर पुण्यात परततो आणि बातमी येते कि नचिकेत विहीरीत बुडून मेला. समीरच्या कोवळ्या मनावर फार मोठा आघात होतो आणि मृत्यूशी आलेला हा पहिला अनुभव त्याच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देते आणि तो एका कटी पतंग सारखा इथे तिथे भटकत फिरतो.
गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, मंदार देवधर, रेणुका दफ्तारदार, त्याला वेगळे अनुभव येतात आणि वेगवेगळे माणसे भेटतात. पण समीर घरी परततो का? त्याचे मन 'नॉर्मल' होते का ? त्याच्या जीवनाची घडी सावरते का? अशी हि एक दिग्दर्शकाची स्वतःच्या अनुभवावर आधारित कथा, सरळ आणि सोपी मांडणी, चांगला अभिनय आणि चांगले लिखाण ह्याचे चांगले मिश्रण.

मंदार देवधरचा समीर अतिशय प्रभावी. आलोकचा नचिकेत उत्तम. ह्या मुलांच्या अभिनायासाठी चित्रपट पहावा. त्यांना मोहन आगाशे, सुलभा देशपांडे, ज्योती सुभाष ह्या वरिष्ठ कलाकारांची चांगली साथ. अमृता सुभाष, विना जामकर लहानशा भूमिकेत लक्ष्यवेधी. गिरीश कुलकर्णीचा 'काका' प्रभावी.
सुधीर पळसाने ह्यांचे छायांकन सुंदर. गावातले घर आणि शहराचा गोंगाट अतिशय चांगल्या रीतीने टिपलेले आहे. संकलन जरा प्रभावी पाहिजे होते कारण चित्रपट फारच संथ गतीने उलगडतो. संगीताला फारसा वाव नाही. बर्‍याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला हा चित्रपट नक्कीच पहावा.

 
दर्जा:   - संदीप हट्टंगडी ©मराठीमुव्हीवर्ल्डसाठी



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.