Untitled Document
Change Language: English  | Thursday, September 02, 2010
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता सिनेमा परीक्षण मुलाखत
 
 
Untitled Document
झेंडा संगीत विश्लेषण
अवधूतचा  झेंडा उंच फडकू दे
रोहन पाटील © मराठीमुव्हीवर्ल्ड
Zenda चित्रपट: झेंडा
संगीत: अवधूत गुप्ते
गीत: गुरु ठाकूर , अरविंद जगताप ,

अवधूत गुप्ते ची निर्मिती , दिग्दर्शन आणि संगीत असल्यामुळे या चित्रपटाबद्दल लोकांना फारच अपेक्षा आहेत ... आणि त्या आशा अवधूतने भन्नाट संगीत देऊन कायम ठेवल्या आहेत ... गाणी ऐकल्यावर त्याच्याच शब्दात म्हणावसं वाटते .. ' मित्रा , तोडलंस रे ...'

 - कोणता झेंडा घेऊ हाती - ज्ञानेश्वर मेश्राम सारख्या दमदार आवाजातले झकास गाणे ...
Rock संगीतात मधेच वाजणारे मृदुंग हा एक वेगळच प्रयोग अवधूत ने यशस्वी केला आहे... पुन्हा पुन्हा ऐकावेसे ... रोमांचक ..

- सावधान -   यासारखे मराठी Hard Rock क्वचितच ऐकायला मिळते ... 'सावधान .. वणवा पेट घेतो आहे '  खरोखरच आग लावणारे गाणे आहे  ...

- सांग ना रे मना -   'Not only Rock..  ' यापूर्वी अवधूतने  romantic गाणीही छान केली आहेत .. हे ही एक असेच  सुंदर गाणे स्वप्नील   बांदोडकर आणि निहिरा जोशी च्या आवाजात..

- जल जले  - नेहमीप्रमाणे एक तरी हिंदी गाणे अवधूत च्या अल्बम मध्ये असतेच .. यातही आहेत..  Guitar आणि Drums  भन्नाट .... तितकेच जबरदस्त त्याने गायले आहे .

- आसूओ कि खवाइशे - आणखी एक हिंदी गाणे .. माहित नाही इतक्या हिंदी गाण्याची गरज आहे कि नाही चित्रपटात .. पाहिल्यावरच कळेल. ते काहीही असो गाणे एकदम 'कडक' आहे  ... अप्रतिम कोरस  ..

- पत्रास कारण कि बोलायची हिम्मत नाही - खरच मलाही बोलावसं वाटत नाही. फारशी वाद्ये न वापरताही प्रभावकारी वाटते.. शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आधारित ....

- पाटील आला - एक ठीक ठाक लावणी ... आवडण्यासाठी कदाचित जरा जास्त वेळेस ऐकावी लागेल 

- नाखवा रे (Bonus Track) - एक  OK OK कोळीगीत ...

गीतकार गुरु ठाकूर , अरविंद जगताप , अवधूत यांनी लिहिलेल्या गाण्यान्माधील शब्द न शब्द प्रभावादार आहेत.. ताजेतवाने  आहेत.. मित्रा अवधूत .. मराठी संगीतात असाच वादळ निर्माण करत राहा ...

जिंकलस रे लेका, चाबूक

 
 
Untitled Document
मुख्य पृष्ठ| संपर्क